पिंपरी चिंचवड -पि.चि.महानगरपालिकेतील हद्दितील आठवी पास महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर गरजू महिलांना वाहन खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे. महिला स्वयरोजगार व्हाव्यात म्हणून मोरवाडी आय.टी.आय.ऑनलाइन परीक्षेचा सराव करून घेण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.सुनीता तापकीर यांनी दिली.महापालिका हद्दितील आठवी पास महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्या साठी एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी कोणतेही सहभाग शुल्क आकरले जाणार नाही. एक लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांकडून केवळ २५ टक्के सहभाग शुल्क आकारले जाणार आहे. विधवा महिलांकडून कडून शुल्क आकारले जाणार नाही. वयाची २२वर्षे पूर्ण केलेल्या महिला या योजने मधे सहभागी होऊ शकतात. महिलांना चार चाकी हलकी वाहने चालवण्याचे प्रशिक्षण महापालिकेतर्फे देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गाच उद् घाटन भाजपचे शहर अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या हस्ते महापालिका भवनाच्या आवारात करण्यात आले. वाहन प्रशिक्षण देण्याकामी महापालिकेने दोन मोटर प्रशिक्षण संस्थांची नेमणूक केली आहे. या योजनेतील सहभागी महिलांना वाहन परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला
त्यांच्या निवसाजवळील मनपा दवाखान्यातून देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गाच्या उद् घाटनप्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायि समिती अध्यक्ष ममता गायकवाड व पक्षनेता एकनाथ पवार, महिला बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, सिमा सावळे, हर्षल ढोरे, आशा धायगुडे, निर्मला कुटे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टेकर, सहायक आयुक्त स्मिता झगडे, आण्णा बोदडे व संभाजी येवले आदी उपस्थित होते.