नवी मुंबई (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.१८.०१.२०२३
नवी मुंबई- सामाजिक चळवळीत नेहमीच अग्रेसर असणारे प्रा. दत्ता हेगडे सर यांच्या परिवर्तन एज्युकेशन सोसायटी, आधार इंडिया व परिवर्तन उद्योग समूह चे संपर्क कार्यालय उदघाट्न समारंभ १६ जानेवारी रोजी पंचवटी प्लाझा शॉप ११३ घणसोली (रेल्वे स्टेशन जवळ)येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे अनेक हितचिंतक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र वाकळे, उद्योजक गुरु, माजी नगरसेवक घनश्याम मढवी, अप्पाराव थोटे (बसपा अध्यक्ष ) राजेश जैस्वार, सुनील खंडाळे, जिजामाता सोसायटी अध्यक्ष सर्जेराव गर्जे, प्रा.अविनाश, सिद्धार्थ ठोकळे, फिल्म चर्मकार ऐक्य चे नितीनसर,व डोईफोडे सर, डी.आर शिंदे, प्रतिभा अनभोरे, जया मॅडम, भारती मॅडम, शिंदे मॅडम, मनीषा मानकर, सारिका हेगडे, भोसले मॅडम, अंबिका मॅडम, अश्विनी मॅडम, पत्रकार जे. के. पोळ, विनोद धुरंदर, चर्मकार ऐक्य चे सूर्यवंशी, गणेश चव्हाण, प्रफुल्ल हंबर्डे हे उपस्थित होते. सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक दत्ता हेगडे यांनी केले तसेच पत्रकार राजू माने यांनी उत्तम नियोजन केले होते.