पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०८.०८.२०२२
ज्ञानार्जन करणारा समाज निर्माण झाला पाहिजे- डॉ.प्रशांत नारनवरे
पुणे- शिक्षित माणसे समाजात असली पाहिजेत समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन वैज्ञानिक विचारसरणी जोपासावी महापुरुषांच्या विचारानेच शिक्षणाची दार उघडे झाली. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण प्रभुत्व निर्माण केले तर आपण शासनकर्ती जमात बनु शकतो शिक्षणामुळेच ज्ञानर्जन करणारा समाज निर्माण होतो असे मत समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बोलताना व्यक्त केले .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे संस्थेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ वी जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येरवडा, पुणे -६ येथे सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घघाटन मा. डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले .
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये म्हणाले की अण्णाभाऊचे बहुआयामी पैलू उलगडण्याचे काम बार्टी करत असून ताऱ्याप्रमाणे महापुरुषांनी सर्वांना प्रकाश देण्याचे कार्य केले उपेक्षित वंचित समाजाला बार्टीच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बार्टी कटिबद्ध असल्याचे सांगून अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त बार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवून संपूर्ण राज्यात जयंती साजरी करण्यात आली असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. श्री.धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे, श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, श्री.विकास गायकवाड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, डॉ.प्रेम हनवंते, संशोधन अधिकारी, डॉ.संभाजी बिरांजे, इतिहास संशोधक, डॉ.सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर श्री.अंकल सोनावणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्री रमेश राक्षे, ज्येष्ठ विचारवंत, श्री. रावसाहेब खंडागळे, अध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती येरवडा, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. मान्यवरांना भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास आयुक्त, समाजकल्याण, महासंचालक बार्टी यांनी भेट देऊन पाहणी केली. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना डॉ प्रशांत नारनवरे, श्री धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्ताविक श्रीमती इंदिरा अस्वार यांनी केले. सुत्रसंचलन निवेदक दिपक मस्के यांनी केले आभार डॉ प्रेम हनवते यांनी केले.