मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.०२.२०२०
बीजिंग – चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे भारत, अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत २५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९००० हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातलं आहे. भारताने चीनमधून येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणारी ई-व्हिसा सुविधा तात्पूरती थांबवल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय दूतावासाने ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर तात्पूरती बंदी घातली आहे. ‘सध्याच्या घडामोडींमुळे ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीनचे पासपोर्टधारक आणि चीनमध्ये राहणारे अन्य देशाचे नागरिक यांना ही बंदी लागू असणार आहे. ज्यांना यापूर्वीच ई-व्हिसा मिळाला आहे, त्यांचा ई-व्हिसा वैध नसेल असं दूतावासाने जाहीर केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.