मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनीधी,
दि.३१,०१,२०२४
नवी मुंबई- देशाच्या प्रजासत्ताक दिनी ऐरोली, नवी मुंबई येथे ‘महाराष्ट्र आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट असोसिएशन’चा द्वितीय ‘वर्धापन दिन’ सोहळा मोठया उत्साहात पार पडला. यावेळी असोसिएशनकडून विविध उपक्रम तसेच मनोरंजनाचे, लोकहिताचे कार्यक्रम राबवण्यात आले.
महाराष्ट्रातील समस्त कष्टकरी आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट बंधू – भगिनींच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आयुर्वेदाचार्य डॉ. संजयकुमार छाजेड (नाडी गुरु) यांच्या हस्ते वयाच्या ४५ ते ५० वर्षावरील अजूनही कार्यरत असण्याऱ्या वरिष्ठ थेरपिस्ट तसेच आताच पंचकर्म थेरपिस्ट क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या व १ ते २० वर्ष अनुभव असलेल्या सर्व थेरपिस्ट बंधु – भगिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी संजयकुमार छाजेड सरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. असोसिएशनद्वारे नियोजन समितीमधील सर्व सदस्यांच्या सहकार्यातून संपूर्ण कार्यक्रम साकारण्यात आला.
मिळालेला सन्मान, कार्यक्रमाची रंजकता व भविष्यातील आपली उन्नती व समृद्ध जीवनशैलीची असोसिएशनने मांडलेली संकल्पना पाहून सर्व भारावून गेले. यावेळी आयुर्वेद पंचकर्म थेरपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सागर सुर्वे, सचिव श्री.बंडू बेडेकर, खजिनदार सौ.मंगल निकाळे, सल्लागार मनीष चोपडेकर, सदस्य – मनीष पाटील, महेश लोहार, कविता भोसले, सोनाली कळंत्रे, राजेंद्र झेपले, सरिता निंबाळकर, उमेश पावसकर, संगीता सावंत, सलोमी वल्लुरी, योगिता पवार, अश्विनी कांबळे, छाया नरसाळे, लक्ष्मण सरमळकर, स्वाती यादव, संगीता मिश्रा तसेच असोसिशनसोबत जोडले गेलेले सर्व थेरेपिस्ट बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.