सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०८.२०२२
पाटण- १ ऑगस्ट२०२२ रोजी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंतीदिनी डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती पाटण मार्फत डॉ.आंबेडकर स्मारक पाटण म्हावशी येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कला रत्न पुरस्कारांचे वितरण सामाजिक, साहित्यिक, कला इ.क्षेत्रात योगदान असणाऱ्या पाटणच्या सुपुत्रांना प्रदान करण्यात आला त्यामध्ये जळवचे सुपुत्र जळव पंचशील बौद्ध विकास मंडळाचे सल्लागार उच्चशिक्षित प्रा.शिक्षक श्री. सुनिल माने सर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महामानवांच्या विचारांचे अनुकरण अनुसरण करणारे महापुरुषांच्या जीवनाचे भाष्यकार शब्दकार नावाने ओळखले जाणारे माने सर यांचे सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदान विविध सामाजिक कार्यक्रमांतून त्यांचे सामाजिक उद्बोधन, प्रबोधन सदैव चालू असते. साहित्याची आवड असणारे,विविध पुस्तकांचे प्रचंड वाचन अन् लेखन हा त्यांचा छंद. ते स्वतः उत्कृष्ठ लेखक, निवेदक,वक्ते,कवी म्हणून प्रसिध्द आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या वाणी आणि लेखनीचे ते उपासक आहेत. त्यांचे विविध विषयांवरील लेखन प्रचंड शब्दप्रभुत्व व भाषा प्रभुत्वाने त्यांच्या लेखनीला एक वेगळी धार आहे.अनेकांना त्यांच्या लेखणीची भुरळ पडते. अनेक छोटया मोठया कार्यक्रमांत ते उत्कृष्ठ व्याख्यान, सूत्रसंचालन करतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. नुकतीच त्यांनी पत्रकारितेतील पदवी प्राप्त केली आहे. आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झालेले आता आपल्या पाटणच्या भूमीत त्यांना लोकशाहीर आण्णा भाऊ साठे कला रत्न पुरस्काराने गौरवांकित केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.