पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०१.२०२३
देहूरोड- वंचित बहुजन आघाडी शाखा विकासनगर किवळे यांचे वतीने
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी पिं.चिं. शहर सचिव यल्लेश उर्फ अप्पू शिवशरण यांनी सुत्रसंचलन केले. शाखाध्यक्ष मा.सुनिल मोरे, शाखेचे सचिव दिलीप धोत्रे, पिं.चिं. शहर संघटक अभिजीत सिध्दार्थ चव्हाण, शिवसेना नेते नवनाथ तरस, बाळासाहेबांची शिवसेना युवा नेते निलेश तरस, युवा नेते राजेंद्र तरस, राष्ट्रवादीचे युवा नेते बापूसाहेब कातळे, युवा नेते दीपक भोंडवे, युवा नेते संतोष म्हस्के, बापदेव महाराज ट्रस्ट चे संचालक सुधीर तरस, जेष्ठ नेते दिलीप कडलक, आम आदमी पार्टीचे रोहित सरनोबत, मनसेचे नेते राजूशेठ येवते, रोहीत माळी, आनंदा रामराजे , बाळासाहेब डाके, बाबू कंडेरा, शिवाजी देवकुळे, करण शिवशरण, आत्माराम इंगळे, हेमंत साळवे, राजू शास्त्री, हनुमंत आदिमले, दिनेश बोरावडे, सुमित पाटील इत्यादी उपस्थित होते .