पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०३.२०२४
भोसरी- श्री. संत नरहरी सेवा संघ पिंपरी चिंचवड संस्थेद्वारा संत शिरोमणी श्री.नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी रविवार दिनांक ३मार्च रोजी मोठ्या उत्साहात, भोसरी येथील मंदिरात साजरी करण्यात आली. भागवताचार्य श्री .ह .भ. प. विष्णू महाराज मिरधे यांच्या सुश्राव्य प्रवचनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
विद्यार्थी, महिला व अनेक समाज उपयोगी कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा ,भगिनींचा सत्कार नरहरी महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.
तत्पूर्वी,दीप प्रज्वलन व नरहरी महाराज आणि गजानन महाराज प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात, श्री.व सौ .मेघा मधुकर प्रभाकर खोल्लम, श्री. व सौ. रेखा प्रकाश गोपाळ बेल्हेकर, व सेवा संघाचे अध्यक्ष श्री व सौ जयश्री संजय केशव बेदरकर यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित होते. दे. दैवज्ञ सुवर्णकार समाज आळंदी -धर्मशाळेचे अध्यक्ष श्री सचिन केशव टकले, नरहरी प्रतिष्ठानचे श्री दिलीप शांताराम फाकटकर, नरहरी महाराज संस्था -देहुगावचे अध्यक्ष श्री. भरत काळूराम बेल्हेकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.अरुण थोपटे, सुवर्णकार सराफ असोसिएशन- आळंदी देवाची संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश बिडकर, श्री शांताराम नारायण बेल्हेकर, श्री दत्तात्रय निघोजकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने कुमार दिवीज वैभव टकले, सौ. शिल्पा अजित निघोजकर, सौ. सोनाली सुनील घोडेकर, श्री. प्रकाश गोपाळ बेल्हेकर, श्री .दिलीप वसंतराव खोल्लमकर, सौ. धनश्री अजित फाकटकर, श्री. चंद्रकुमार घोडेकर, श्री. किशोर अशोक खोल्लम, श्री. राजेंद्र शंकरराव खोल्लम आदींच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रवचनामध्ये ,श्री मिरधे महाराज यांनी नरहरी महाराजांचे ,ज्ञानेश्वरीचे काही अभंग यांच्यावर विवेचन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे सांगत मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला महिला वर्गाला दिला. घरातील , आपसातील ,समाजातील संवाद वाढवण्यावर त्यांनी भर दिला. कुठलेही मुके जनावर अथवा पक्षी पाळण्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला व जर कोणी पाळत असेल तर त्या मुक्या जीवांना निसर्गात मुक्त करण्यात यावे असे आवाहन केले. साधी- सरळ उदाहरणे देत व बोली भाषेत नामाचे महत्त्व व भक्तीचे महत्त्व विशद करत भक्तीचा मार्ग धरण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री संजय बेदरकर यांनी समाजाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर माजी अध्यक्ष श्री मच्छिंद्र खोल्लम यांनी मंदिराची जागा संदर्भातील सुरू असलेल्या संघर्षामध्ये संस्थेचे विद्यमान व जुने विश्वस्त मिळून करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली व सदर जागेसाठी संघर्षामध्ये तमाम बहुजन समाजाचा मिळणारा पाठिंबा हाही विषद केला. परंतु, समाजातीलचं काही घटकांतून होणारा विरोध हा क्लेशकारक असल्याचे त्यांनी विशद केले व येणाऱ्या काळामध्ये असा अंतर्गत विरोध सहन केला जाणार नाही असा कडक इशारा दिला.
संस्थेचे सचिव श्री दत्तात्रय चांदेकर यांनी भविष्यामध्ये सदर जागेवर लवकरच सभामंडप उभा राहील व सदरची जागा चांगल्या पद्धतीने विकसित होईल असे सांगून उपस्थितांना आश्वस्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहखजिनदार श्री रवी बेल्हेकर, अंतर्गत हिशोब तपासणीस श्री. किशोर अशोक खोल्लम, विश्वस्त सदस्य श्री अरुण त्र्यंबकराव खोल्लम, सहसचिव सौ वैशाली महेश खोल्लम, विश्वस्त श्री किरण घोडेकर, श्री राहुल रमेश खोल्लम, श्री दीपक वसंतराव खोल्लम, सौ वैशाली सुनील खोल्लम, श्री दिलीप वसंतराव खोल्लमकर, सौ मंजुषा सचिन बेल्हेकर, सचिव श्री दत्तात्रय चांदेकर, अध्यक्ष श्री संजय केशव बेदरकर, माजी अध्यक्ष श्री मच्छिंद्र खोल्लम, सल्लागार श्री प्रकाश बेल्हेकर, समाज बांधव श्री चंद्रकुमार घोडेकर, सौ प्रिया घोडेकर, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
श्री व सौ शिल्पा अजित निघोजकर परिवाराने नरहरी महाराजांच्या मूर्तीस चांदीचा हार सप्रेम भेट म्हणून दिला. तसेच दानशूर व्यक्तिमत्व श्री राजेंद्र शंकर खोल्लम यांनी रुपये ११००१ देणगी स्वरूपात घोषित केले.
त्यानंतर आभार प्रदर्शन, आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे खुमारसदार सूत्रसंचालन सचिव श्री दत्तात्रय चंद्रकांत चांदेकर यांनी केले.