विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, आमदार, विरोधी पक्षनेता प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, खासदार ते केंद्रीय मंत्री अशी उंची गाठलेले महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांसाठी लढणारे लोकनेते, कोणताही राजकीय वारसा नसताना उच्चपदापर्यंत मजल मारली.त्या गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा संघर्ष अत्यंत खडतर व प्रेरणादायी आहे.अफाट जनसंपर्क, जनसंवादातुन जनतेशी जोडलेली नाळ, जि. प सदस्य ते मंत्री हा प्रवास सदैव खूप कष्टदायी राहिला. युनोमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्यही त्यानां लाभल. अशा लोकनेत्याचा जन्म १२ डिसेंबर १९४९ रोजी परळीतील नाथरा या गावातील शेतकरी कुटुंबात झाला.
कर्तृत्वाच्या बळावर विविध पदांना गवसणी घालत , लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. संघर्षातून सुरुवात करणाऱ्या या लोकनेत्याच्या वाट्याला आयुष्याच्या शेवटपर्यत संघर्षच आला. त्यांनी अनेक छोटया कार्यकर्ताला मोठे केले. म्हणूनच तेही लोकनेते झाले. संवाद आणि संघर्षामुळे लोकांनी जात, धर्म, पंथ व पक्ष या पलिकडे जाऊन लोकांनी प्रेम विश्वास दिला . वडील पांडुरंग व आई लिंबाबाई मुंडे हे वारकरी असल्याने, गोपीनाथ मुंडे यांनी सलग सात वर्षे पंढरपूरची वारी केली .१९६९ मध्ये त्यांचे पितृछत्र हरपले, त्यानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आई आणि मोठे बंधू पंडितआण्णानी शिक्षण सोडून गोपीनाथराव मुंडे यांचे शिक्षण पूर्ण केले.
उच्चं शिक्षण घेत असताना ते कॉलेज निवडणूकित किंगमेकर ठरत कायम विजय मिळवत राहिले. त्याची भेट प्रमोद महाजन यांच्याशी झाली, पुढे त्याच्या मैत्रीची मृहृतमेढ रोवल्या गेली पुढे त्यानीं मुंडेना विद्यार्थी परिषदेत काम करण्याची संधी दिल्याने भाजपला चांदयापासून बांद्यापर्यंत घरा-घरात कार्यकर्ता निर्माण केला. आणीबाणीच्या काळात मुंडेना तुरुंगवास भोगवा लागला. युवा मोर्चाच्या जबाबदरी मिळाली अन , राजकीय प्रवास सुरू झाला.पहिल्यांदा १९७८ मध्ये जि. प तर १९८० मध्ये रेणापूरचे आमदार झाले.त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.भाजपला त्याच्या नेतृत्वाखाली, पक्षाला ओ.बी.सी नवा चेहरा मिळाला,राज्यात पक्ष बळकट झाला आलं.
१९९५ ला युतीचे सरकार आले त्यात गृहमंत्री उपमुख्यमंत्री झाले. मुंडे साहेबानी दूरदृष्टी ठेवून राज्याच्या हिताचे कठोर निर्णय घेत , राज्यात कायदा सुव्यवस्थेंची घडी सुरळीतबळ बसवली, मुंबईतील टोळी गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं.
कष्टकरी,ऊसतोड मजुरांना ऊर्जा प्रेरणास्थान.देण्यासाठी दर वर्षी भगवान गडावर मेळावा घेत, बाबांच्या भक्तांसोबत सोनं लुटत, विकासाची धुरा हाती घेत,ऊस मजुरचे प्रश्न सोडत, मी जरी तुमच्यापर्यंत पोहचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय..!हे शब्द आजही जनतेच्या ह्रदयात करत आहेत.
सामाजिक चळवळीत मुंडेनी निर्णायक भूमिका घेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची लॉंग मार्ग असो की मंडल आयोगासाठी पाठिबा, या सामाजिक न्यायाचा मानदंड मानल्या गेले यामुळे राज्यात भाजपला नवी ओळख मिळाली. दिली.त्यासोबत जेव्हा महाराष्ट्रात गणपती दूध पितो अशा अंधश्रद्देवर विश्वास नाही”, असे ठणकून सांगत,विज्ञानवादी भूमिका घेतली.नगर, नाशिक मधून पाणी मराठवाड्यात सोडल्यानें गोदाकाटच्या गावात पाणी घुसल्यानें आधाररासाठी गोदापरिक्रमा केली. मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी कृष्ण खोरे, पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी नदीजोड प्रकल्पानें आणत, मराठवाड्या सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहिले होते, माझा माझ्या ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता गेला पाहिजे,मुलं शिकत, नौकरीला लागले पाहिजेत याचा आग्रह धरत राहिले. लोकनेत्यांचा वैशिष्ट्येपूर्ण गुणांमुळे जनतेला आपुलकी जिव्हाळा वाटतं.साहेब हेलिकॉप्टर आले की , लोक नवं ऊर्जानें वाट पाहत, लोकसंपर्काच्या बळावर त्यांनी सत्ता नाही म्हणून त्यांची उपेक्षा करण्याची किंवा दखल न घेण्याची हिंमत कुणी केली नाही. जनतेच्या समस्यांची जाणीव होती
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सव्वालाखाहून अधिक मतांनी विजयी झाले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत स्थान मिळेल ही अपेक्षा फोल ठरली. कायम त्याच्या वाट्याला संघर्षाशिवाय काहीच मिळाले नाही. तीन दिवस संघर्ष करत ग्रामविकासमंत्री म्हणून शपथविधी घेतली, जिल्ह्याला केंद्रात प्रथमच स्थान मिळाले. होते, जिल्ह्यत आनंदला उधाण आले होते. शपथविधीनंतर १ जूनला श्रध्दास्थान असलेल्या बाबांच्या दर्शनासाठीच भगवान गडावर आले होते. नंतर फडणवीस,जानकर यांच्या समवेत ते चोंडी येथे गेले. २ तारीख गेली आणि ३ जून २०१४ ला सकाळीच साहेबांच्या अपघाती निधनाची बातमी आली. देश शोक सागरात बुडाला, एवढ प्रेम जनतेने कधीच कोणाला दिल नसेल . अफाट बुद्धीमत्ता ,दुरदृष्टी आणि प्रचंड आवाका ,असणाऱ्या लोकनेत्याचा . नियतीने हा डाव अर्ध्यावरतीच मोडला! तमाम जनतेच्या मनात आठवणीचे काहूर माजले. चार दशकाच्या संघर्षाचा आस्त झाला. ऊसतोड कामगारांच्या कोयत्याची धार, आणि आधार गेला .आजही संपूर्ण महाराष्ट्र गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आठवणीने हाळवा होतो आहे.अशा या लोकनेत्यांच्या स्मृतिदिना विनम्र अभिवादन.
श्री. अर्जुन थोरात.
आष्टी (बीड )
मो. ९८५०००७४३१