पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०१.२०२३
पुणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज आमची प्रगती होत असुन संविधानामुळेच आम्हाला संधी मिळाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेच आपली प्रगती होणार असुन बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी बार्टी संस्थेच्या विविध योजना व उपक्रम वंचित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात महासंचालक म्हणून त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असुन मि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा राज्यमंत्री असताना सामाजिक न्याय विभाग व बार्टी संस्थेच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या बार्टी संस्था चांगले काम करत असुन आम्ही बार्टी सोबत असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दिलिप कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले. बुधवार दिनांक १२ जानेवारी २०२३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे माजी राज्यमंत्री दिलिप कांबळे यांनी बार्टी संस्थेस भेट दिली. बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी त्यांना बार्टी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली. यावेळी दिलिप कांबळे यांनी धम्मज्योती गजभिये यांनी महासंचालक म्हणून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मा कांबळे, मा. गजभिये यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..