पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०७.२०२२
पुणे- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने आझादी का अमृत महोत्सव तथा छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्ष निमित्त देशभरात दहा ठिकाणी संविधान परिषद घेण्यात येणार आहे. त्यामधील पाच परिषदा महाराष्ट्रात (नागपूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, कोल्हापूर) मध्ये व उर्वरित पाच परिषदा महाराष्ट्राच्या बाहेर (दिल्ली, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ) या ठिकाणी संपन्न होणार आहेत.
नागपूर येथील पहिली संविदान परिषद यशस्वी रित्या पार पडल्यानंतर औरंगाबाद व पुणे येथे होणाऱ्या संविदान परिषदेच्या नियोजनासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश माने सर हे रविवार १०जुलैला साय. ४:०० वा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र स्तरीय बैठक घेणार आहेत. बैठकीला मराठवाडा व पुणे जिल्ह्यातील सर्व जबाबदार पदाधिकारी उपस्तिथ असणार आहेत अशी माहीती पुणे जिल्हा अध्यक्ष धीरज बगाडे यांनी दिली आहे.