ठाणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०८.२०२२
ठाणे- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप अंतर्गत, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा केंद्र कोशिंबी, ता.भिवंडी जिल्हा ठाणे येथे आनंदात साजरा करण्यात आला. प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे प्रतिमेला सहशिक्षक अशोक गायकवाड व मुख्याध्यापक जगदीश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांचे जीवन कार्यावर विद्यार्थ्यांना उद्बोधनपर मार्गदर्शन केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या वकृत्वाद्वारे महापुरुषांच्या जीवनचरित्रावर व कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते.