मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.१२.०१.२०२४
नवी मुंबई- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे व महाराष्ट्र महिलाअध्यक्षा सुनीताताई चव्हाण यांच्या आदेशाने, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब ओव्हाळ, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शांतिसागर सरवदे, नवीमुंबई जिल्हा प्रभारी प्रकाश पवार (गोळवसकर) आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षामध्ये विविध पक्ष व संघटणा च्या कार्यकर्त्यांचे प्रवेश, पक्षाचे ध्येय-धोरणे व पक्ष वाढीसाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. सदरची बैठक नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी दि.०९ जाने. २४ रोजी संपन्न झाली.