नवी मुंबई (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी मिलिंद राऊत.
दि.२४.०२.२०२३
घणसोली- स्थानिक प्रकल्पग्रस्त रीक्षाचालक-मालक संघटना घणसोलीगाव, संन्डे मार्केट स्थानक यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती दि. १९ फेब. २०२३ रोजी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संध्याकाळी भव्य रिक्षारॅली काढून महाराजांना मानवंदना देण्यात आली.
रविवार बाजार रिक्षा स्थानकावर छत्रपती शिवाजीमहाराज जयंती कार्यक्रमाची सुरूवात सन २०२० मध्ये दिवंगत शिवभक्त चेतनबुवा साळुंखे यांनी केली होती आणि संघटनेचे जयंती कार्यक्रमाचे हे ०३ वर्षे होते.
यावेळी कार्यक्रमास स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रेमनाथ म्हात्रे, ठाकरे गटाचे नवी मुंबई उप.जिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी ,नगरसेवक घनश्याम मढवी , नगरसेवक लक्ष्मण पाटील, नगरसेवक वाघमारे, मा.नगरसेवक चंद्रकांत पाटील तसेच पत्रकार, अनेक मान्यवर, स्थानिक रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.