दोन दिवसा पूर्वी पालघरच्या ग्रामीण भागातील खेड्यामध्ये दोन हिंदू साधू व त्यांच्या एक ड्रायव्हर यांची जमावकडून अगदी निर्घृण हत्या करण्यात आली हे दोन साधू मुबाईहून सुरतकडे पालघरच्या हद्दीतून जात होते. या भागातून आधीच चोर फिरत आहे अशी अफवा पसरली होती. त्या अफवेस बळी पडून गावाला पहारा देणाऱ्या गावकऱ्यांना हे तेच चोर आहेत असे वाटले आणि त्यातूनच या साधूंची व त्यांच्या चालकाची हत्या झाल्याची बाब समोर येत आहे. घडलेली घटना अतिशय हृदय द्रावक, चिंताजनक व चीड आणणारी आहे.कोरोनाच्या प्राश्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे त्या मुळे सर्वच जिल्हा, गाव यांच्या हद्दी बंद केलेल्या आहेत. अशातच हे साधू प्रवासाला निघाले होते तत्पुर्वी त्यांनी कोणाची परवानगी घेतली होती का ? त्यांनी प्रवासाला जाण्याची एवढी गरज काय होती हा प्रश्न देखील अनुत्तरीतच राहतो.
आज काल देशामध्ये मॉंब लिंचिंगचे प्रमाण अतिशय वाढलेचे दिसते सदर बाब ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायद्याच्या, राज्याच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. पण या टप्प्यावर देश कसा पोहचला हा प्रश्न सोडविल्या शिवाय येत्या काळात गत्यंतर नाही. या प्रश्नाची उकल करताना सन २०१५ मध्ये दादरी मधील मोहंमद आखलाख या तरुणाची बीफ बाळगण्याच्या आरोपातून मॉप लिचिंग घडवून आणली होती. २०१८ मध्ये झारखंड मध्ये अलामुद्दीन या तरुणाची आशीच बीफ बाळगण्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली विशेष म्हणजे केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांचे हस्ते आरोपींना जमीन मंजूर झाल्यावर आरोपींचा सत्कार करण्यात आला होता. या वरून भाजप सरकारला या घटना घडवायच्या होत्या की काय हा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाही.
भाजप सरकार सत्तेत आल्या पासुनच म्हणजे २०१४ च्या पुढे मॉब लिंचिंगच्या घटना मध्ये वाढ झाल्याचे दिसुन येते. Reuters च्या रिपोर्ट नुसार सन २०१० ते २०१९पर्यत २८ भारतीय नागरिकांची मॉब लिंचिंगने हत्या करण्यात आली त्यापैकी २४ जन हे मुस्लिम होते. १२४ जणांना जखमी केले गेले आहे. २०१४ नंतर गोरक्षकांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आल्यानंतर हत्येच्या प्रमाणात वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.
२०१५ साली मोहंमद आखलाख या ५२ वर्षीय व्यक्तीवर उत्तर प्रदेशातील दादरी मध्ये गोहत्याच्या कारणावरून जमावाकडून हत्या झाली होती. अशा वेळी केंद्र सरकारने वेळीच कठोर पावले उचलली असती तर अनेक निष्पाप जीव वाचवता आले असते तसेच परवाची पालघरची घटना देखील घडली नसती.
पालघरच्या घटने मध्ये मरणारे व मारणारे देखील असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या या मॉब लिंचिंगच्या आजवरच्या घटना दुर्लक्षित केल्यानेच या घटना घडल्या आहेत असेच म्हणावे लागेल म्हणून भविष्यात भाजपने बोया पेड बबूल का आम कहासे? ही उक्ती लक्षात ठेवावी.
श्री. किरण शिंदे.