२०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी ५९ नामनिर्देशन अर्जाची खरेदीपिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,दि.२२.१०.२०२४पिंपरी – २०६ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज विहित वेळेत पहिल्या दिवशी एकुण २९ व्यक्तींनी निगडी येथील २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन एकुण ५९ नामनिर्देशन अर्जांची खरेदी केली आहे.या मधे बाळासाहेब नामदेव ओव्हाळ, सचिन महीपती सोनवणे वंचित बहुजन आघाडी, चंद्रकांत महादेव लोंढे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, युवराज भगवान दाखले शिवशाही व्यापारी संघ, मनोज विष्णू कांबळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, दादाराव किसन कांबळे लोकसेवा पत्रकार असो.,अनिकेत धोडींबा सोनवणे, नवनाथ चंद्रकांत शिंदे, रांजेद्र मानसिंग छाजछिडक , (भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी, राष्ट्रीय बाल्मीकी सेना यांची राष्ट्रीय संयुक्त आघाडी), सुरज चंद्रकांत गायकवाड भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, मनोज भास्कर गरबडे वंचित बहुजन आघाडी,राजु सुदाम भालेराव महाराष्ट्र नवनिर्मान सेना, रविंद्र रामदास ओव्हाळ, बाबा बाळु कांबळे, चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे, सुंदर मसुकांत कांबळे, नाथा खंडु शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना,निलेश उल्हास नेटके म.न.से, अण्णा दादु बनसोडे राष्ट्रवादी कॉग्रेस, सुधिर हिंदुराव कांबळे, सुरेश मधुकर लोंढे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार, प्रा. डॉ, हेमंत अरुण देवकुळे भा.ज.पा./ अपक्ष , अँड. गौतम सुखदेव चाबुकस्वार शिवसेना उ.बा.ठा, दिपक सौदागर रोडे, शौल विश्वास कांबळे, धमेंद्र किसन क्षीरसागर भा.ज.पा, शैलेंद्र उर्फ विवेक विष्णू विधाते राष्ट्रवादी कॉग्रेस,शरदचंद्रजी पवार, देवेंद्र सहदेव तायडे, डॉ. काशिनाथ महादेव बामणे असे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.