नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०५.२०२०
येवला- उत्तर प्रदेश,बिहार आणि राजस्थानातील परप्रांतीय ३५० मजुरांना परिवाहन खात्याच्या १३ बस मधून प्रशासनाच्या वतीने रवाना करण्यात आले. एकीकडे घराची ओढ तर दुसऱ्या बाजूला हाताचे काम सोडून जाताना मजुरांचे डोळे पाणावले होते. गावोगावी तलाठी कार्यालयात परप्रांतीय मजुरांची नोदणी करण्यात आल्यानंतर या सर्व मजुरांना येवला येथील बस स्थानकावर आणण्यात आले. आहारात मंगळवारी परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या बस सॅनिटाइझने स्वच्छ करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन महिन्यानंतर ओस पडलेले बस स्थानक परप्रांतीय मजुरांच्या गर्दीने फुलून गेले होते. मध्यप्रदेश येथील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी तीन बसमधून नाशिक रोड रेल्वेस्टेशन वरती सोडण्यात आले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चालक लासुरे यांचा सत्कार करण्यात येऊन बस रवाना झाल्या.
यावेळी भुजबळांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, श्रावण जावळे, आनंद शिंदे, तहसीलदार रोहिदास वारुळे, आगर प्रमुख प्रशांत गुंड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख, वाहतूक नियंत्रक गुलाबराव जानराव, मधुकर, डॉ. योगिता गायकवाड,डॉ. पवार, डॉ. वैद्य, औषध निर्माण अधिकारी शोभा वाघ आदी उपस्थित होते. या वेळी विर सावरकर संस्थेचे श्रावण जावळे, आनंद शिंदे, आदींसह सोशल फोरम संघटनेतर्फे परप्रांतीय मजुरांच्या नस्ता व पाण्याची सोय करण्यात आली.



















