सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.११.२०२०
फलटण- लोणंद येथिल पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर लोणंद नजीक असलेल्या बाळू पाटलाची वाडी गावाच्या हद्दीत पांद शिवारात रेल्वे रुळावर अनोळखी पुरुष (दि.५ नोव्हें) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. या घटनेची खबर पोलीस पाटील सचिन धायगुडे याने लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे. मयताचे अंगावर लाल रंगाचा टी-शर्ट, निळी पॅन्ट, हातामध्ये रबर कडे तसेच उजव्या हातावर राजाराणी असे गोंदलेले आहे. सदर मयत व्यक्ती बाबत कोणास काही माहिती मिळाली तर त्वरित लोणंद पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात लोणंद पोलिसां कडून करण्यात आले आहे.



















