नाशिक(निर्भीड पत्रकर न्युज नेटवर्क)प्रतिनिधि,
दि.२४.११.२०२०
मालेगाव- बेळगाव पाडे गावा मधे रस्त्याच्या बाजूला नागरिक शौचास बसतात त्यामुळे परिसरात हगनदारीची निर्मिती झाली आहे. या विरोधात तक्रार देऊन देखील काहीच कारवाई होत नाही. येथील नागरिक योगेश पंडित आहिरे यांनी याची कल्पना उपसरपंच गोटीराम सोनवणे यांना दिली व सदर परिसर हगणदरी मुक्त करण्यात यावा यासाठी मागणी केली तसेच गावकऱ्यांचे प्रबोधन करून सदर प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावर एक दिवस त्या परिसराची स्वच्छता करण्यात आली व दुसऱ्या दिवसापासून आहे तीच परीस्थीती पुन्हा तयार झाली. या बाबत तक्रार करण्यासाठी आहिरे यांनी उपसरपंच गोटीराम सोनवणे यांना फोन द्वारे संपर्क साधला असता उपसरपंच सोनवणे यांनी आहिरे यांना उर्मटपणे उत्तरे दिली. सध्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधली असुन देखील गावामध्ये हागणदारी निर्माण होत आहे. याबाबत जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर ग्रामपंचायतच्या या भोंगळ कारभारा बाबत रहीवासी नाराजी व्यक्त करत असून गोटीराम सोनवणे उपसरपंचाच्या उर्मटपणा बद्दल जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.



















