पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०९.२०२१
पिंपरी- भा.ज.पा.च्या नगरसेविकेने आयुक्त राजेश पाटील यांच्या नामफलकावर शाई फेकली असून या प्रकरणी पोलिसांनी आठ महिलांसह दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
आयुक्त राजेश पाटील यांना भा.ज.पा. नगरसेविका आशा शेडगे या प्रभागातील समस्या घेऊन भेटण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आयुक्त भेटले नाहीत याचाच राग अनावर झाल्याने शेडगे यांनी आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकली अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा शेडगे यांच्या प्रभागात सध्या रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी खड्डे असून ते बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सांगितले. परंतु, ठेकेदाराकडून खड्डा बुजवण्यात आला नाही. हीच समस्या घेऊन शेडगे या महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्यास गेल्या होत्या. मात्र, आयुक्त इतर दुसऱ्या कामामुळे नगरसेविका शेडगे यांना भेटू शकले नाहीत. याचाच राग अनावर झाल्याने काही महिलांसह त्यांनी आयुक्तांच्या फलकावर शाई फेकली अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आठ महिला आणि दोन तरुणांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिलीय.



















