पुणे (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.१२.२०२१
दौंड- पारगाव येथे राजगृह ग्रंथालय माय रमाई वधु वर सूचक केंद्र चे अमर चौरे संस्थापक यांनी सुरु केलेले आजतागायत सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. १५ पुस्तके घेऊन सुरवात केलेलं राजगृह ग्रंथालय आज सुमारे ४३५ पुस्तकं असून ग्रंथालय अनेक वाचकांच्या भेटीस उपलब्ध आहे. या ग्रंथालयास अनेक पुस्तक प्रेमींनी पुस्तक भेट दिले आहेत. यात कवी, लेखक, गझलकार, कथाकार, अशा अनेक व्यक्तींनी ग्रंथालयास सहकार्य केले आहे. या ग्रंथालयातून आता पर्यंत विविध पुस्तक वाचकांनी वाचून ग्रंथालयास पुन्हा जमा केली आहेत. ग्रंथालया मार्फत वाचनास दिलेलं पुस्तकास कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही ते पूर्णपणे वाचनास मोफत दिले जाते. त्यामुळे अनेक वाचकांनी याचा लाभ घेतला आहे. या ग्रंथालयास पुस्तकं देणगीदार म्हणून विशेष सहकार्य महाराष्ट्रचे उत्कृष्ट कवी वाय के शेख आणि त्यांचे बंधू प्रसिध्द गझलकार ए के शेख तसेच पारगावचे मा.सरपंच.कवी रा.वी शिशुपाल, डॉ.संध्या शेलार, डॉ.सागर शिंदे, डॉ.सुजाता शिंदे, विजय वनशिव, प्रभाकर गायकवाड, सूर्यकांत तांबे अशा मान्यवरांनी पुस्तक देऊन सहकार्य केले. तसेच त्यांचे ग्रंथालयातर्फे दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक धन्यवाद असेच सहकार्य आमच्या संस्थेला द्यावे हीच ईच्छा यावेळी अमर वनशिव, अध्यक्ष दौंड तालुका यांनी व्यक्त केली.
माय रमाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रमाई वधु वर सूचक केंद्र यांच्या वतीने आता २३८ पर्यंत सर्वधर्मीय लग्न जमवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर चौरे व माय रमाई वधु वर सूचक केंद्रांचे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत असतात.या संस्थेमार्फत सर्वधर्मीय लग्न जमवले जातात. ग्रंथालया मार्फत कोणत्याही प्रकारची सभासद नोंदणी फी किंवा पुस्तक वाचनाची फी आकारली जात नाही ते पूर्णपणे मोफत आहे.जास्तीत जास्त वाचकांनी या मोफत पुस्तक वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरेखा नाईकनवरे अध्यक्ष पुणे जिल्हा व सारिका मोरे, महिला आघाडी दौंड यांनी केले.



















