पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.१२.२०२१
दौंड- तालुक्यातील भीमानदीच्या बागायती पट्ट्यात बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणीचे काम सुरू आहे. यामुळे बिबटे सैरभैर झाले आहेत.संभाव्य धोका विचारात घेऊन आहे’ असा सतर्कतेचा इशारा कामगार व शेतकऱ्यांना दिला जात आहे. ‘सावधान… येथे बिबट्यांचे वास्तव्य उसाची शेती बिबट्यांचा निवारा केंद्र बनले आहे. त्यामुळे बागायतीपट्ट्यात त्यांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात अनेक जनावरे जखमी व मृत्युमुखीही पडले आहेत. या पार्श्वभूमीवर ऊस तोडणीच्या कामासाठी कामगार सकाळी लवकर उठून आपल्या मुलांबाळांबरोबर उसाच्या शेतात दाखल होताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.एकीकडे कामगार ऊस तोडणीत गुंतलेले असतात, तर दुसरीकडे त्यांची मुलं शेतातच खेळत असतात.उसाच्या शेतात अनेकदा बिबट्यांची बछडे आढळून येत आहेत.त्यामुळे ऊसतोडणीचे काम करताना कामगारांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.



















