निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.११.२०२१
३६ जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
पुणे- राज्यात कोविड लसीकरणाची सक्ती केली जात आहे. या कोविड लसीकरणाच्या सक्तीविरोधात २० डिसेंबर २०२१ रोजी बहुजन मुक्ती पार्टीने आंदोलनाचे हत्यार उपसले असून राज्यातील ३६ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. कोविड लसीकरणाच्या सक्तीविरोधात आवाज उठवणारी बहुजन मुक्ती पार्टी एकमेव अशी आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ऍफीडेव्हीट लिहून दिले आहे की, कोविड लसीची सक्ती करता येणार नाही. तसेच मणीपूर, कर्नाटक, गुजरात, राजस्थान येथील उच्च न्यायालयाने लसीची सक्ती केली जाऊ शकत नाही असा निकाल दिला आहे. सक्ती करणे म्हणजे संविधान कलम क्र.१४, १९ व २१ चे उल्लंघन आहे. असे निकाल दिलेले असताना राज्यातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य विभागांना पत्र पाठवून लसीची सक्ती करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. नागरिक, कर्मचारी, कामगार, मजूरांना लस घेणे सक्ती केले आहे. त्याचबरोबर शासकीय मूलभूत योजना देण्याचे बंद केले आहे. प्रवास करणे, शाळा-महाविद्यालात येणे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश व प्रशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक दिवसीय राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. ही निदर्शने दुपारी १२ व ३ या वेळेत केली जाणार आहेत असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी केले आहे.



















