नासिक(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३.०४.२०२२
नाशिक- लग्नाचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश येवला शहर पोलिसांनी केला आहे या कारवाईमुळे मराठवाडा इथून मुली आणून मुलांकडून लाखो रुपये उकळायचे नंतर मुलींनी पळून जायचे असा प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे लता अशोक केदार वय 60 वर्ष गणपती मंदिर च्या बाजूला पारेगाव रोड येवला येथील रहिवासी यांनी या प्रकरणाची तक्रार केली त्यानंतर पोलिसांकडून या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. फिर्यादी लता केदार यांचा मुलगा गणेश व त्यांचे पती अशोक केदार यांच्याकडून घरी तीन लाख रुपये घेऊन राजश्री काळोखे हिचे खरे नाव सोना कांबळे ही मातंग समाजातील असतानाही वंजारी समाजाची आहे असे खोटे सांगून रिटायर कॉन्स्टेबल यांचा मुलगा गणेश त्याची फसवणूक केली आहे लक्षात आल्यावर केदार यांनी फिर्याद दिली रॅकेट उघडकीस आणण्यास मदत केली याबाबत मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात येवला शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली त्यात त्यांनी सांगितले की आंबेजोगाई तालुका बीड येथे साहेबराव विठ्ठल गीते ४३ राहणार जायगाव रोड ब्राह्मणवाडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व संतोष मुरलीधर फड वय ३७ राहणार भुसे भेंडाळी तालुका निफाड जिल्हा नासिक यांना तीन लाख रुपये प्रकरणी २४ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या टीमने अटक केली त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे परिसरात याबाबत फसवणूक झाली असल्यास ताबडतोब संपर्क साधण्याचे आव्हान शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या वतीने करण्यात आले आहे



















