मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१३.०७.२०२२
मुंबई- नवी मुंबई मधील घणसोली गावातील मच्छी मार्केटमध्ये खूप महिन्यांपासून मच्छी विक्रेत्यांना पाण्याची टंचाई भासत होती. बाथरूम व मार्केटमध्ये साफ सफाई तसेच मच्छी साफ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई होत असे त्यामुळे नेहमीच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. वारंवार महानगरपालिकेच्या अधिकार्यांना तक्रार करूनही अधिकारी मात्र नेहमीच उडावा उडवीची उत्तर देत उदासीन होते यामुळे सर्व मच्छी विक्रेते मोठे त्रस्थ होते.
मार्केट मध्ये केवळ एकच पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे व सदर टाकीमध्ये पाण्याची सार्वजनिक पाईप लाईन टाकण्यात आली नाही त्यामुळे दररोज मच्छी विक्रेत्यांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
🔹अखिल भारतीय सेनेने स्वखर्चाने केली सर्व कामे पुर्ण
हे सर्व मच्छी विक्रेत्यांनी अखिल भारतीय सेनेच्या निदर्शनास आणून दिले असता सेनेच्या युवा टीमने स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करून स्वताच्या हाताने व स्वखर्चाने सर्व काम पुर्ण करून दिले. त्यामुळे सर्व मच्छी विक्रेते अखिल भारतीय सेनेचे युवा अध्यक्ष मयूर मढवी व टीमचे कौतुक करून त्यांना धन्यवाद देत आहेत.



















