सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.०८.२०२२
साहित्यरत्न अण्णाभाऊचे साहित्य विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देते
वाटेगाव- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य येथील व्यवस्तथेविरोधात लढण्याची प्रेरणा देते त्यांनी विषमते विरुद्ध बंड करून कथा, कादंबऱ्या, पोवाडे, नाटक, कादंबऱ्याचे लिखाण करून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. “जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले बाबा भिमराव” हा संदेश दिला व फकिरा ही कांदबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीस अर्पण केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची शाहिरी, लेखणी मानव मुक्तीकडे घेऊन जाणारी होती असे मत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना ज्येष्ठ विचारवंत श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे संस्थेच्या वतीने बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, यांच्या नियोजनबद्ध पुढाकाराने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध कार्यक्रमांद्वारे संपूर्ण राज्यात साजरी करण्यात आली.

सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी अण्णाभाऊ चे जन्मस्थळ वाटेगाव, ता वाळवा, जिल्हा सांगली येथे बार्टी संस्थेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .अध्यक्षस्थानी श्रीमती माधवी सरदेशमुख , जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सांगली या होत्या.
श्री उमेश सोनवणे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी, श्री खुशाल गायकवाड , उपायुक्त सांगली , श्रीमती सावित्रीबाई साठे , अण्णाभाऊंच्या सुनबाई, श्री सचिन साठे, अण्णाभाऊचे नातू , श्री देवराव पाटील, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली, ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे , श्री रवींद्र बर्डे ,माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद सांगली, श्रीमती शुभांगी पाटील ,सभापती पंचायत समिती वाळवा, श्री सुरेश साठे ,सरपंच वाटेगाव , श्री विकास गायकवाड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक प्रकाशन व प्रसिद्धी विभाग बार्टी, श्री संभाजी पवार, संशोधन अधिकारी सांगली, डॉ. ज्ञानोबा चाटे , संशोधन अधिकारी बार्टी , श्री गणेश सवाखंडे, प्रकल्प अधिकारी समतादुत सांगली जिल्हा, श्री रामदास लोखंडे.. आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांना भारतीय राज्यघटनेची प्रत, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे खंड , भेट देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी बार्टी संस्थेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाटेगाव येथे विविध उपक्रमाद्वारे अण्णाभाऊंना अभिवादन करुन जयंतीचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी बार्टी संस्थेचे आभार मानले. शाहीर सचिन माळी ,शीतल साठे, भानुदास गायकवाड, भास्कर सदाकळे ,आलम बागणीकर यांनी आपल्या शाहिरीद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या विचाराचा जागर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शाहीर ,कलाकार , बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी, समतादुत , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन डॉ. प्रेम हनवते, संशोधन अधिकारी बार्टी यांनी केले. प्रस्ताविक श्री उमेश सोनवणे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख बार्टी यांनी केले. आभार श्री विकास गायकवाड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, प्रकाशन व प्रसिद्धी विभाग बार्टी यांनी मानले .



















