अंत्यविधीला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,मिलिंद राऊत
दि.२१.०३.२०२३
नेरूळ- रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे खंदे समर्थक, ज्येष्ठ नेते, उत्कृष्ट वक्ते, विचारवंत, साहित्यिक, कुशल संघटक अश्या विविध ख्याति प्राप्त असलेले उत्तर भारत प्रभारी भगवान (भाई) सावंत यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी नेरूळ येथील राहत्या घरी १९ मार्च रविवार रोजी सकाळी ८ वा. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अकस्मात निधन झाले.
मुंबई महालक्ष्मी येथील सेंट्रल रेल्वेची सेवा करून तीन वर्षा पूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. नेरूळ सेक्टर १८ येथील निवासस्थानी त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुलगे, दोन सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दुपारी ४ वा. सेक्टर दोन येथील स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी पार पडला.
अंत्यविधी प्रसंगी रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर, वंचीत बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष भूषण कासारे, कामगार नेते राजेंद्र दादा गायकवाड, आरपीआय आठवले गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे, रोजगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगताप, ठाकरे सेना नेते विजय माने, शिंदे गटाचे प्रदीप वाघमारे, जेष्ठ नेते सिद्धार्थ जाधव, रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजामिया पटेल, महिला जिल्हा प्रमुख रेखा इंगळे, प्रकाश वानखेडे, नंदकुमार भालेराव, दीपा बम आदीसह नवी मुंबई रिपब्लिकन सेना कार्यकारिणी, भारतीय बौद्ध महासभा व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



















