पुणे ( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
भोर : खोपी दि. १४ /१०/२०१८ येथे ६२ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या ऊत्साहामध्ये संपन्न झाला. बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली.मैत्र्येय कांबळे,यश भोसले,आदर्श दिपंकर,ऊत्कर्ष दीपंकर,गोकुळ कांबळे, सुवज्र रनदीवे ,मृनाली भोसले,सुमेधा कांबळे,स्मृती रनदीवे ह्या लहान मुलामुलींनी आपापली मनोगते व्यक्त केली.खोपीच्या पोलीस पाटील तृप्तीताई कांबळे,विजेंद्र गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून बुद्धीस्ट प्रेरणा गृप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे उपस्थित होते.आजच्या काळात समाजाने सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.खोपी वासीयांच्या पाठीशी संपूर्ण शक्तीनिशी उभे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.किरण शिंदे यांनी सादर केलेल्या कविताना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.यावेळी किरण शिंदे यांनी बाबासाहेबानी दिलेल्या 22 प्रतीज्ञा सर्वांकडुन म्हनवुन घेतल्या व त्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.सम्राट विजेंद्र गायकवाड यांनी भेट दिलेल्या सम्राट अशोक यांच्या प्रतीमांचे वाटप किरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचा शेवट धम्मपालन गाथेने करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिलरत्न दिपंकर यांनी केले.याप्रसंगी,किरण शिंदे,संदीप जोगदंड,नंदकुमार जोगदंड, सुमित गायकवाड,विजेंद्र गायकवाड,गुलाब भोसले,अनिल कांबळे,चंद्रकांत कांबळे,मिलींद कांबळे,सुभाष कांबळे,सिद्धार्थ कांबळे,निलेश कांबळे,विजय कांबळे,करन कांबळे,विशाल कांबळे,शीलरत्न दिपंकर,शांतीजीत रनदीवे,अशोक भोसले,दादु भोसले,अश्विनी कांबळे(ग्रा प सदस्य)तृप्ती कांबळे(पोलीस पाटील)सुमन कांबळे,रेश्मा काकडे,भारती रणदीवे,दीक्षा कांबळे,रोहीनी कांबळे,रंजना दीपंकर,शांताबाई कांबळे,सवीता भोसले,सिमा भोसले,कावेरी कांंबळे,संगीता कांबळे यांचेसह मोठ्यासंख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतिप्रीय मित्रमंडळ खोपी यांनी सहकार्य केले.



















