बीड(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.४/३/१९
बीड,सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट असताना एकीकडे डिजीटल इंडियाच्या गप्पा मारल्या जातात, गायीला देव मानल जातय तिला वाचवले पाहीजे आश्या गप्पा शासन मारतय मग त्या गाईला चाराच द्यायला का मागे सरतय? चारा छावण्या का उभारत नाहीये शासन काय जनावरे मेल्यावर चारा छावण्या उभारणार का? सरकारच डोक तर ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाकोषाध्यक्ष सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी प्रसारमाध्यशी बोलताना केला. काल खालापूरी सह परीसराचा दौरा केला व जनसामान्य माणसांना शेतकऱ्यांनां भेट घेऊन समस्या विचारल्या असता परीसरात व सबंध जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परीस्थिती दिसून आली. जनसामान्यांचे हे हाल पाहवत नाहीत तिसरा महायुध्द पाण्यासाठी होतय का काय? अशी दुष्काळ जन्य परीस्थीती आज जिल्हाभरात आहे. शासनाने वेळीच दखल घेऊन जलसाठे आरक्षित केले असते तर किमान त्यात तरी पाणी राहिले असते पण हल्ली परीस्थिती अशी आहे की “आडातच नाय तर पोहऱ्यात काय?” सर्व छोटे तलाव कोरडे थंड पडले आहे आणी मग पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. खेड्यापाड्यात खूप गंभीर स्थीती आहे अजून चार पाच महिने जायचेत त्यामुळे वेळीच पर्यायी व्यवस्था निर्माण करावी. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे जनावरांना चाऱ्याचा आहे पशुधन जगवायच कस हा शेतकरी राज्यापुढे मोठा गंभीर प्रश्न आहे म्हणून शासनाने व धनदांडग्याण्णी एकत्र येऊन छावण्या चालू कराव्यात खालापूरी परीसरात एक छावणी आसन अत्यंत गरजेच आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी त्वरीत छावणी द्यावी असे नम्र आव्हान भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाकोषाध्यक्ष मा.सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले.त्यांनी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर प्रकाश झोत टाकला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत असून आत्तापासूनच नियोजन करायला पाहीजे नदीवर बंधारे बांधून वेळीच पाणी संवर्धन केले पाहेजे नसता “तहान लागल्यावर विहीर खान्दने” अशी परीस्थीती निर्माण होते. त्याआधी वेळीच आपण जर शेती,नदया,नाले, ओढे बांध बंधीस्त केले तर त्याचा चांगलाच फायदा होईल. प्रत्येक गावाला दोन ते तीन कोल्हापूरी बंधारे मंजूर झाले तर गावात पाण्याच्या समस्या उदभवणार नाहीत हे झाल पाहिजे अशी अशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. शासनाने तसच जनतेनेही या सामाजिक कामाला सुरुवात करून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना रुड केली पाहिजे व तिचा अवलंब करून ही धरती सुजलाम सुफलाम करायला पाहिजे. कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे आणी शेतीला पाण्याची नितांत गरज आहे मग आपण पाणी संवर्धन आगोदर करणे गरजेचे आहे असेही मत डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.



















