सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,संतोष पवार
दि.२३.०६.१९
महाराष्ट्रात अॅट्राॅसिटी संदर्भातील सर्व खटल्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी.अशी मागणी निवेदनाद्वारे रिपाई (A) चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेशदादा कांबळे यांनी केली आहे.
तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आर्यन खडसे नावाच्या मांतग समाजाच्या मुलाला मंदिरात गेल्याने.गरम फरशीवर नग्न करुन बसवले .त्यामुळे त्याला खुप मोठ्या प्रमाणात जखम झाली. अशा घटना रोखण्या साठि.व जातीभेदाला जरब बसवायचा असेल तर आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहीजे. देशात १७९ न्यायालये कार्यरत आहेत.मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, राजस्थान,छत्तीसगढ,तमिळनाडु, गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, केरळ, या राज्यांमध्ये विशेष न्यायालये कार्यरत असुन या यादीत महाराष्ट्राचे नाव नाही. सदरील निवेदनाच्या प्रती .केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदासजी आठवले राज्य सामाजीक न्याय मंत्री अविनाश महातेकर, जिल्हाधीकारी,पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.



















