लातूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०६.१९
लातूर- ऑटोरिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीच्यावतीने ऑटोरिक्षा पदाधिकारी, चालक व मालक यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे (पुणे) हे मेळाव्याचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर (नागपूर), उपाध्यक्ष प्रमोद घोणे(मुंबई), राज्य संपर्क प्रमुख नरेंद्र गायकवाड, वैजिनाथ देशमुख (नांदेड), सुग्रीव शिंदे, प्रभाकर निकम, नाना जावळे(बिड), इम्रान पठाण मोशीन शेख(औरंगाबाद), विष्णु साबदे(लातूर), मिर्झा नबाब बेग, नारायण पांडे बालाजी कोकरे, मराठवाडा विभागांतील कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.या मराठवाडा विभागीय मेळाव्याचे आयोजन ऑटोरिक्षा चालक मालक कृती समितीचे सहसचिव व परवानाधारक रिक्षा संघटनेचे सरचिटणीस मा.श्री.मच्छिंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
◆ प्रमुक मागण्या खालील ◆
● ऑटोरिक्षाचे मुक्त परवाने वाटप तात्काळ बंद करा
● घोषणा केलेल्या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी परिवहन विभागमार्फत चालू करा
● ऑटोरिक्षाचे वाढलेले इन्शुरन्स दरवाढ रद्द करा
● ऑटोरिक्षा चालकांसाठी घरकुल योजना राबवावी
● ऑटोरिक्षा चालकास RTO च्या जिल्हास्तरीय कमिटीवर संधी निर्माण करून देणे
● राज्यातील ओला उबेर वर कार्यवाही करून त्याला हद्दपार करा
● राज्यातील अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कार्यवाही करा. इत्यादी प्रलंबित मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर ९जुलै रोजी मध्यरात्री पासून ऑटोरिक्षाचे बेमुदत ऑटो बंद करून संप हे आंदोल करण्यात येणार आहे,
या आंदोलनात मराठवाड्यातील एक लाख पेक्षा अधिक रिक्षा चालक मालक सहभागी होणार असल्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या मेळाव्यात कृती समितीची मराठवाडा कार्यकारणी जाहीर करण्यात आली, त्यात प्रामुख्याने वैजनाथ देशमुख (महाराष्ट्र उपाध्यक्ष) नांदेड, विष्णू साबदे लातुर, (उपसचिव महाराष्ट्र) इम्रान पठाण ,(औरंगाबाद) दिनेश कांबळे (लातूर) राज्यकार्यकारणी सदस्य, प्रभाकर निकम (बिड) कार्यध्यक्ष मराठवाडा आदी नेत्यांची ही निवड करण्यात आली.मेळाव्याची सांगता महाराष्ट्र राज्यातील ज्या ऑटोरिक्षा चालकांनी आत्महत्या केली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परवानाधारक रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश शिंदे, सरचिटणीस मच्छिंद्र कांबळे, कोषाध्यक्ष अनवर भाई पठाण, वसंतराव ढमाले, उमाकांत पवार, सूर्यकांत संगापुडे, हरिभाऊ गायकवाड, तानाजी शिंदे, सतीश कणके, पांडुरंग सागर, बालाजी तुपे, रामचंद्र लखादिवे, रघुनाथ सपकाळ, माऊली राजपंगे फोटोग्राफर अतिक भाई इत्यादींने परिश्रम घेतले.



















