पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२८.०६.१९
पिंपरी- उच्च न्यायालयानेही मराठा समाजाच्या मागणीवर शिक्का मोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही शिवशाही व्यापारीसंघाचे व लहुजी शक्तीसेना पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पदाधिकारी मनापासून स्वागत करतो. पण आता मराठा बांधवान बरोबर अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांनी तसेच बहुजन समाजाने आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे शासनाने तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी मी व शिवशाही व्यापारीसंघाचे सर्व पदाधिकारी आपणाकडे करित आहोत. आपण गंभीर याने सदर निवेदनाची दखल घेऊन आंदोलकांनवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे



















