चंद्रपुर (निर्भिड न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,योगेश्वर पि.शेंडे
दि.३०.०९.१९
नागभिड- अॉगस्ट महीन्यापासुन सततधार पावसामुळे खुप ठिकानी घराची पडझड झाली आहे.शेतातील शेतमालाचे खुप नुकसान झाले आहे.नागभिड तालुक्यातील येनोली माल या गावचे श्री.महादेव अभिमान गेडाम यांचे घर दि.२९सप्टेंबर१९ रोजी सायंकाळी आलेल्या पाऊसामुळे राहते घर पुर्णपणे पडले असुन त्यांच्या घरातील घरगुती सामानाची खुप नुकसान झाले आहे. त्याठिकाणी कुणाचीही जिवितहाणी झालेली नाही.त्यांची आर्थिक परीस्थिती हलाकीची असल्यामुळ त्यांना सध्या राहण्यासाठी कुठेच जागा उपलब्ध नाही, त्यांना कुणाचाही साहारा नसल्यामुळ ते एकटे त्या घरात राहात होते.त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे.त्यांना लवकरात लवकर शासनाकडुन घरकुल योजणेचा लाभ देण्यात यावा व आर्थिक मदत मिळावी म्हणजे त्यांना आधार होईल ही अपेक्षा त्यांनी शासनाकडुन बाळगली आहे.



















