सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०९.१९
फलटण – तालुक्यामध्ये महावितरण कंपनी ग्राहकांना व येथील शेतकर्यांना लुटालुटीचे धंदे सुरू केले आहेत बिलपावती न देताच बिल वसूली करण्याचे काम कॉन्ट्रॅक्टर सुरू आहे.मिटर रिडींग वेगळे आणि यांचे कागदाचे बिल वेगळे नक्की बिल भरायचे कोणते असा प्रश्न सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. हे धंदे फलटण तालुक्यातील साखरवाडीसह खेड्यांमध्ये चालू आहेत महावितरण कंपणीचे कर्मचारी हे बिल घेण्यास येतात त्या वेळी त्यांना ग्राहकांनी पुरवठा देयक बिल पावती मागीतली असता त्यांच्या कडे उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांनी स्वता लिहलेली बनवलेली बिले घेऊन बिल घेण्यास येतात,बिल न भरले म्हणून लाईट कट करून जातात. ग्राहकांना चालू रिंडीग मागील रिडींग युनिट एकुण विज वापर समजण्याचे गरजेचे आहे पण येथील महावितरण कंपणीचे कर्मचारी मनमाणी करून गरीब शेतकर्यांचे व गरीब जनतेचे पैसे लुटताना दिसत आहेत.तरी याकडे महावितरन कंपनीचे वरीष्ट या कडे लक्ष देतील का? फलटण तालुक्याची लुटालुट थांबवतील का? अशी चर्चा सर्वसामान्य जनेतेमध्ये चालू आहे.परिसरात वीज चोरीचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे या कडेही वितरण कंपनी अधिकारी काना डोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.याचाच फटका सर्व सामान्यांना बसत आहे.



















