नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.५.१०.१९
नाशिक- शिवसेना आणि भाजप ने महायुतीतील जागावाटपात रिपब्लिकन पक्षाच्या हक्काच्या जागा कार्यकर्त्यांसाठी मागितलेल्या जागा सोडल्या नसल्यामुळे रिपाइंवर जागावाटपात अन्याय झाला आहे. जागावाटपावर रिपाइं नाराज आहे हे खरे असले तरी आंबेडकरी समाजाला अधिक सत्तेतील सहभाग मिळवून देण्यासाठी अन्य कोणताही पर्याय समोर नसल्याने रिपब्लिकन पक्ष अन्याय सहन करून या विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ देणार आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे,राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रियकीर्ती त्रिभुवन,डी एम चव्हाण,भाजप आमदार देवयानी फरांदे,महायुती चे उमेदवार निर्मला गावित,सुहास कांदे आदी मान्यवर उपस्थित होते.नाशिक- शिवसेना आणि भाजप ने महायुतीतील जागावाटपात रिपब्लिकन पक्षाच्या हक्काच्या जागा कार्यकर्त्यांसाठी मागितलेल्या जागा सोडल्या नसल्यामुळे रिपाइंवर जागावाटपात अन्याय झाला आहे. जागावाटपावर रिपाइं नाराज आहे हे खरे असले तरी आंबेडकरी समाजाला अधिक सत्तेतील सहभाग मिळवून देण्यासाठी अन्य कोणताही पर्याय समोर नसल्याने रिपब्लिकन पक्ष अन्याय सहन करून या विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ देणार आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे,राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रियकीर्ती त्रिभुवन,डी एम चव्हाण,भाजप आमदार देवयानी फरांदे,महायुती चे उमेदवार निर्मला गावित,सुहास कांदे आदी मान्यवर उपस्थित होते.



















