सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.७.०१०.१९
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी कडून काल निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून सत्तेत आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ,बेरोजगारांना भत्ता ,शून्य टक्के दराने शैक्षणिक कर्ज, आधी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड सचिन सावंत,अनिल गोटे,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नावाब मलिक, शेकाप स्वाभिमानी शेतकरी संघटना, बी आर एस पी यांचे नेते उपस्थित होते, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की आघाडी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर १३ टक्के होता तो आता१०.४ टक्के इतका आहे यावरून राज्यातील बेरोजगारीने उच्चांक गाठला असल्याचे दिसते.
◆ जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा
८० टक्के नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना पाच हजाराचा मासिक भत्ता, केजी टू पीजी मोफत शिक्षण, शैक्षणिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने, आरोग्य विमा कवच, मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ ,कामगारांसाठी २१००० चे किमान वेतन, सर्वच महापालिकांमध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी.



















