सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.८.०१०.१९
सातारा- संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून असलेल्या माण खटाव मतदारसंघात अखेर “आमचं ठरलंय” या सर्व पक्षीय गटातून प्रभाकर देशमुख यांची अपक्ष उमेदवार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे जाहीर झाले असून, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
भाजपचे जयकुमार गोरे,शिवसेनेचे शेखर गोरे, प्रभाकर देशमुख व अन्य ८ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत जयकुमार गोरे, शेखर गोरे व प्रभाकर देशमुख यांच्यामधेच होणार असल्याने या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















