नाशिक (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.१०.१०.१९
नाशिक- धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने त्रिरश्मी लेणी येथे जिल्हा भरातुन हजारोच्या संख्येने अनुयायी दर्शनासाठी येतात स्वच्छता भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छता नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत मात्र दुसरीकडे शहरातील त्रिरश्मी लेणी येथे आलेल्या नागरिकांना सुविधांचा अभाव. परिसरात पालिकेच्या वतीने केवळ शेडनेटचा वापर करत शौचालय उभारण्यात आले होते. या प्रकारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागल्याने महापालिकेच्या भोगंळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिक व महिलांच्या सुविधेसाठी पालिकेच्या वतीने मोबाईल टॉयलेट व्हॅन उभारणे अपेक्षित होते. मात्र पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या भोगंळ कारभारामुळे या ठिकाणी शेडनेट उभारले व तात्पुरता शौचालयाची व्यवस्था करण्यात आलीहोती.
शेडनेट पारदर्शी असल्याने नागरिकांना व महिलांना अडचणीचा सामना करावा लागला. महापालिका कडुन शहर स्वच्छता नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करत विविध उपक्रम योजना राबवल्या जातात. दुसरी कडे शौचालयाच्या नावाखाली पालिकेकडून असा खेळ केला जात असल्याने भिमसैनिक व भिमअनुयायी यांच्या कङुन संताप व्यक्त केला जात होता. या भोगंळ कारभाराकडे महापालिकेच्या अधिकारी यांनी गंभीरपणे लक्ष देऊन दोषीं कर्मचारी व अधिकारी यांच्या वर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. त्रिरश्मी लेणीचे सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या विशेष असे महत्त्व आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिक. महिलां व अनुयायी यांच्या दृष्टीने महापालिकेच्या अधिकारी यांनी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे मात्र दुसरीकडे अशाप्रकारे शेडनेटची शौचालये उभारत महापालिकेचा भोगंळ कारभार चव्हाट्यावर आला आहे या प्रकारचा संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष बौध्द साहीत्य प्रसारक मङळ प्रमुख अतुल भोसेकर यांनी केली आहे.



















