सोलापूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.११.२०१९
माळशिरस- तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे जोमाने वाढत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.माळशिरस तालुक्यात मटका,बेकायदा वाळू वाहतूक,जुगार,गावठी दारू,अवैध प्रवासी वाहतुक असे अनेक धंदे राजरोसपणे चालू आहेत.पोलिसांकडून यावर कसलेच नियंत्रण नसल्याने जनतेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या गाड्यांना सोडले जाते जे गरीब गाडीमालक चालक नियमानुसार वाहतूक करतात त्यांना नाहक त्रास दिला जातो अशा तक्रारी जनतेतून होत आहेत.त्यामागे आर्थिक धागेदोरे अडकलेले असल्याने पोलीस या प्रकरणाकडे डोळेझाक करत आहे का असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.



















