सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.२.११.१९
फलटण- स्वयंसहायता समूह म्हणजे बचत गट. उमेद अभियाना अंतर्गत बचत गटातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी खराडेवाडी येथे प्रशिक्षणास प्रारंभ झाला . यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच गरीबी निर्मूलन आणि महिला सक्षमीकरण हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता .या अभियानाच्या प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्या मार्फत पाच वर्धिनी महिलांची एक टीम येथे कार्यरत राहणार . असल्याचे सांगण्यात आले. महिलांचे बचत गट गावागावात स्थापन झाले आहेत परंतु त्यांचे काम समाधानकारक नसल्याने शासनातर्फे गट बांधणी करून गटाद्वारे महिलांमध्ये बैठका घेऊन त्यांची जनजागृती करून उमेद वाढवण्याचे काम वर्धिनी करताहेत. उमेद अभियाना अंतर्गत फलटण पंचायत समिती मधून तालुका अभियान व्यवस्थापक एस झेंडे, प्रभाग समन्वयक एच,डी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धिनी सौ रुपाली आबा दडस सौ सविता संतोष जाधव, सौ प्रतिभा गणेश तुपे, सौ स्वाती धनाजी चव्हाण, सौ रुपाली सतीश लकडे आदी काम पाहत आहेत. महिलांना संघटित करून मार्गदर्शन करणे हा उपक्रम राबवीत आहेत. ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ टिळेकर .यांच्या हस्ते अभियानाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व महिला उपस्थित होत्या. मान्यवरांचे आभार खराडेवाडीचे माजी.सरपंच मा.रवींद्र टिळेकर सर यांनी केले.



















