उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अभय गायकवाड
दि.५.१२.१९
उस्मानाबाद- जिल्ह्यातील भूम ता. नळी-वडगाव फाटा येथे चार गावातील शेतकऱ्यांनी मिळून रास्ता रोको केला सततच्या असणाऱ्या वीज कपात व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतीतील पंप चालत नसल्याने उभे पीक करपले जात आहे म्हणून तालुक्यातील तिंत्रज, दांडेगाव, जेजला या गावातील लोकांनी रास्ता रोको केला सध्याचा कालावधी हा शेतीतील पिकांना पाणी देण्याचा असून कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने शेतीतील पंप चालत नाहीत व यात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे म्हणून शेतकरी हवालदिल झालेला आहे बहुतांशी रात्रीची वेळ ही शेतीतील पाणीपुरवठा करणाऱ्या पंपासाठी वीज देण्याची म्हणून ठरवलेली असते परंतु रात्री तसेच दिवसा देखील नियमित वीज पुरवठा होत नाही. तरी विद्युत पुरवठा सुरळीत करून कमीत कमी ८ तासांसाठी उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करण्यात यावा याकरिता उप विभागीय अभियंता यांच्याकडे निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत.



















