सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०६.१२.१९
महाबळेश्वर- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. रात्री बारा वाजता भीमसैनिक मोठ्या संख्येने स्मारकाजवळ उपस्थित होते त्याप्रसंगी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याच प्रमाणे सकाळी ११ वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सामूहिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी समाजसेवक किरण शिंदे, माजी उपनगराध्यक्ष छायाताई शिंदे, शिलरत्न दिपंकर, सामाजिक कार्यकर्ते तौफिकभाई पटवेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख राजू गुजर, विभागप्रमुख राजु सोंडकर, भिमराव यादव, बी एस यादव गुरूजी, उत्तम भालेराव, नितीन गायकवाड, सुमित कांबळे, अमोल काकडे, नयन वने, अरुणा काकडे, रेश्मा कांबळे, संगीता कांबळे, रंजना कांबळे, सुरेखा कांबळे, सिंधू वने, पुष्पा सपकाळ, राधा चव्हाण, राधा खरे, संगीता खरे, नंदा मोरे, सुनंदा रोकडे यांच्यासह शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















