मुंबई (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.६.१२.१९
दादर- बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.चैत्यभूमी येथे दरवर्षी लाखो आंबेडकर अनुयायी भेट देतात यामध्ये महिला,आबाल,वृद्ध,अपंग यांचा देखील समावेश असतो.”आपला समाज आपली जबाबदारी” या बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या अभियानांतर्गत या सर्व समाजघटकांसाठी स्वयंसेवक म्हणून संघटनेच्या सदस्यांनी आपले कर्तव्य पार पाडले तसेच भीमसैनिकाना बिस्कीट वाटप देखील संघटने मार्फत करण्यात आले.संघटनेच्या वतीने बाबासाहेबानी भिमअनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञाच्या २०,००० प्रतीचे मोफत वाटप करण्यात आले.स्वयंसेवकांनी बाबासाहेबांच्या विचारांचे आपल्या शर्टवर पाठीमागच्या बाजूने लावलेले स्टिकर सर्वांचे ध्यान आकर्षित करत होते.हे स्टिकर लावण्यामागे बाबासाहेबांचे विचार जनमानसात पोहोचविणे हा उदात्त हेतू असल्याचे मुंबई प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी निर्भीड पत्रकारच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.या उपक्रमात संघटनेचे शेकडो स्वयंसेवक संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते.हर्षवर्धन गंभीरे मुंबई प्रदेशाध्यक्ष,भारत साळवे ठाणे जिल्हा अध्यक्ष, अनिल जाधव पालघर जिल्हा अध्यक्ष,सुहास शिंदे मुंबई उपाध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदविला. पुण्याहून सुमित गायकवाड,संदीप जोगदंड,संजीत खारवे,केतन जगताप, विकास ओव्हाळ,अशोक बल्लाळ यांनी सहभाग नोंदवला तर पंकज जाधव,अंकुश जाधव,सचिन पवार,रोहित खरात,मिलिंद जाधव, प्रभाकर बनसोडे,अमित खरात, अमर जाधव,राहुल कड्डरवाघ,तुषार जाधव,अनिल मगरे,माणिक उमाळे, राजू सोनपसारे, सचिन राक्षसकर, सचिन गायकवाड, समाधान शिरसाठ, बुद्धम बोराडे, राजेश घोलप, दशरथ सावंत, वैभव सावंत, विलास सोनवणे, सचिन निकाळजे,शैलेंद्र बनसोडे,शशिकांत बल्लाळ, सम्यक जोगदंड, मंदार पवार,सूर्यकांत साळवी,ऍड.तुषार साबळे, किरण गायकवाड, महेश कुरणेकर यांच्यासह मोठ्यासंख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.या अभिनव अशा उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाबळेश्वर येथे बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्रिसरण व पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
फलटण तालुकाध्यक्ष गोविंद मोरे यांच्या उपस्थितीत सरडे येथील शाळेत बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह नागरिक,विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप ही एक राज्यव्यापी सामाजिक संघटना असून गेल्या ५ वर्षांपासून राज्यभर कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन व इतर विविध संकल्पनेवर बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून कार्य केले जाते.बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भारत घडविणे हे या संघटनेचे ध्येय असून तरुणांची मोठी फळी संघटनेमध्ये कार्यरत आहे अशी माहिती भारत साळवे,अनिल जाधव,सुहास शिंदे यांनी यावेळी दिली.



















