मुंबई (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
मुंबई- राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्ष संपल्यानंतर आता खातेवाटपाचा गोंधळ सुरू आहे. अद्याप राज्याचे सरकार स्थिर झालेलं नसताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात सर्वच पक्ष सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी स्पर्धा करत होते. सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी नेते धडपडत असताना एकाच महिन्यात तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या ४ वर्षात एका महिन्यात आत्महत्येची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. याआधी २०१५ मधे एका महिन्यात ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.



















