पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०४.०१.२०२०
शिक्रापूर- कोरेगावं भीमा येथील सुनियोजनाबद्दल पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले
कोरेगावं भिमा येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या भीम अनुयायांची सुरक्षितता, सामाजिक शांतता,सुव्यवस्था व कायदेविषयक कुठलाही पेच प्रसंग निर्माण होऊ नये या साठी पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलिस अधिक्षक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कर्तव्यदक्षपणे त्यांची जबाबदारी अत्यंत चोख पार पाडल्याबद्दल त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन व आभार मानणारे पत्र भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी चिंचवड शहराचे काळजीवाहू अध्यक्ष मा. इंजि. देवेंद्र तायडे यांच्या सह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस चे अधीक्षक संदीप पाटील यांना त्यांच्या कार्यालयात देण्यात आले.या वेळी रहीमभाई सय्यद, रवींद्र पारधे, धनंजय कांबळे ,एस. आर, गायकवाड यांच्या सह प्रदीप मस्के देखील उपस्थित होते.
या वर्षी विजय स्तंभाला मानवंदना देण्याचे हे २०२ वे वर्ष असुन दरवर्षी देशाच्या वेगवेगळ्या भागांतून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी इथे दाखल होत असतात अत्यंत शिस्तीत आणि शांततेत लाखोंच्या साक्षीने पार पडणाऱ्या या सोहळ्याची प्रशासनाकडून फारशी अशी दखल घेतली जात नव्हती मात्र १ जानेवारी २०१८ रोजी या शौर्य दिनाच्या दिवशी येथे उसळलेल्या देशव्यापी दंगली मुळे संपूर्ण देशात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.या प्रकारावरूनच लाखोंच्या संख्येने जमणाऱ्या या गर्दीची दखल घेत प्रशासनाने गतवर्षी पासुन या ठिकाणी सुनियोजन व व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली.या वर्षी मात्र या ठिकाणच्या व्यवस्थापनाची व नियोजनाची जबाबदारी असणाऱ्या पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी अधिक्षक संदीप पाटील यांच्या नियंत्रणाखाली यात सुसूत्रता आणून अत्यंत सुरेख असं नियोजन व व्यवस्थापन केल्या बद्दल त्यांना अभिनंदनाचे पत्र देण्यात आले.
सदर पत्रात अत्यंत संवेदनशील पार्श्वभूमी असताना देखील सामाजिक सुरक्षितता,शांतता व सुव्यवस्था ठेवणे कामी आपण जी कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस कौतुकास पात्र असुन अगदी विजयस्तंभ परिसरात दाखल झाल्यापासून ते विजय स्तंभाला मानवंदना व अभिवादन करून भिम अनुयायी विजयस्तंभ परिसरातून सुरक्षितरित्या जावू पर्यंत ग्रामीणच्या पोलिसांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाबद्धल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. ज्या संभाव्य बाजूने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनुयायी दाखल होवू शकतो त्या सर्व बाजूने चोख बंदोबस्त व त्याच्या सुरक्षेची व्यवस्था ग्रामीण पोलिसांनी केली होती तसेच ठिकठिकाणी लावलेले ग्रामीण पोलिसांचे दिशादर्शक फलक उपस्थितांना सोयीचे ठरल्याची भावना देखील कित्येक उपस्थितांनी बोलुन दाखवली आहे. एकंदर न भुतो असे सुनियोजन आम्ही अनुभवले त्याबद्दल आपले व आपल्या सर्व पोलिस सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा विशेष कौतुक व अभिनंदन करीत असल्याचा उल्लेख यात केला आहे.



















