सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०४.०१.२०२०
लोणंद- अनेक वर्षांपासून लोणंद येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी (कब्रस्तान) च्या संरक्षण भिंतींची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे यामुळे मोकाट प्राण्यांचा उच्छादामुळे येथील पावित्र्य भंग होत आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेतली जावी म्हणून याबाबत वारंवार लेखी तक्रार करुन, संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी, यांना वारंवार समक्ष भेटीद्वारे, दुरध्वनी द्वारा पाठपुरावा केला तरी सुद्धा संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने सदर संरक्षण भिंतींची योग्य रितीने दुरुस्ती आठ दिवसांत न झाल्यास या नाकर्तेपणा विरोधात नगरपंचायत समोर पोर्च मधे आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी मा. मुख्याधिकारी सो.नावे निवेदनाद्वारे आज (दि.०४ जाने)शनिवार रोजी लेखी स्वरूपात नगरपंचायत कार्यालयाकडे दिला आहे.



















