मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०१.२०२०
मुंबई- कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी राज्यातील आयटीआयच्या मुलामुलींना प्रशिक्षित करणे आणि त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी टाटा ट्रस्ट १० हजार कोटी रुपयांची मदत देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आपण स्वत: आणि टाटा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली आणि त्यात हा उपक्रम राबविण्याचे ठरले. त्यात राज्य शासनाचा वाटा हा १५०० कोटी रुपयांचा असेल. जूनपासून या उपक्रमास सुरुवात केली जाईल आणि तो टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. त्या अंतर्गत आयटीआयना सुसज्ज आणि आधुनिक रुप दिले जाईल. उद्योगांच्या गरजांनुसार रोजगारांची निर्मिती करणे हे मुख्य सूत्र असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.



















