चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०२.२०२०
चिमूर- ग्रामीण भागातील लहान मुलेही आपल्या अंगभूत कलेच्या जोरावर भरारी घेऊ शकतो, हे चिमूर तालुक्यातील पळसगांव (पि) येथील ८ वर्षीय ओम सुधीर जुमडे या लहान मुलाने सिद्ध करून दाखवले आहे. पण त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीने वाद्य संगीताचे शिक्षणही घेत आहे, याच कलेच्या आधारे ग्रामीण भागातील हा लहान बालक ग्रामीण भागात वाद्य वृंद या क्षेत्रात नवरगांव मधून प्रथम श्रेणीत चांगलाच चमकलाआहे. बाल वाडीत शिक्षणाचे धडे गिरवता गिरवता वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षांपासून वाद्य वाजविण्यास त्याने सुरवात केली. त्यांची शिकलेली वाद्य कला कामास आली त्याचे वडील सुधीर महादेव जुमडे ग्राम पंचायतचे कामे सांभाळून हे अनेक वर्षांपासून नाटकाबरोबर,गणपती आरती, भजन गायनाचे काम करत होते. आई यामिनीबाई घरकाम करतात. वाद्य कलेची लहानपणापासूनच आवड होती. त्याचे पाहिले वर्ग शालेय शिक्षण गावातच पूर्ण करत असतानाच त्याने ताशा चांगल्या पद्धतीने गावातील मंगल कार्यक्रमात वाजवीत असे नवरगांव येथे तबला, याचे शास्त्रीय पद्धतीने शिक्षण घेण्यास सुरवात केली. आहे तबला, वाजवण्याचे काम सद्या ते शिकत आहेत,



















