सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०२.२०२०
फलटण- शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी रा.मलटन ता.दौंड जि.पुणे(सध्या राहणार वेंकटेश प्राईड भडकमकर नगर, ता.फलटण
यांना ४ लाख रूपयांची लाच स्विकारले प्रकरणी एसीबीने रंगेहात पकडण्यात आले आहे. सातारा एसीबी च्या विभागाने सदरची कारवाई केली आहे. फलटण तालुक्यात एकाच महिन्यात दोन मोठ्या अधिका-यांवर झालेल्या कारवाई मुळे फलटण पोलीस ठाण्यासह तालुक्यात व जिह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहित अशी की तक्रारदार यांच्या मामाच्या मुलास आरोपी न करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे ज्ञानेश्वर दळवी यांनी २० लाख रुपये रक्कमेची मागणी केली होती. सदर रक्कमेचा पहिला हप्ता म्हणून ४ लाख रुपयांची लाचेची मागणी केलेबाबतची तक्रार दि.१७ फ्रेबुवारी २०२० रोजी दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १७ प्रेबुवारी २०२० रोजी केले पडताळणी कारवाईमधे ज्ञानेश्वर अशोक दळवी यांनी २० लाख रुपये रक्कम लाच मागणी करुन त्या लाच रक्कमेतील एक हप्ता ४ लाख रुपये सोमवार दि.१७ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित केले होते.ज्ञानेश्वर दळवी यांनी लाच स्विकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले असून एसीबी कडून त्याच्यावरती रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सदरची कारवाई श्री. राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक व श्रीमती सुषमा चव्हाण अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलीस उपअधीक्षक श्री.अशोक शिर्के, संजय साळुंखे, विनोद राजे, विशाल खरात, तुषार भोसले यांनी केली आहे.



















