चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०२.२०२०
नागभिड- तहसील अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात रमाई, शबरी व प्रधानमंत्री योजना मोठ्या संख्येने अमलात आणली. परंतु अनेक लाभार्थ्यांची घरे बांधून पूर्ण झालेली आहेत मात्र पंचायत समिती व नगर परिषद यांना शासनाकडून अनुदान आलेले नाही. अनेक घरकुल लाभार्थी हे पंचायत समिती स्तरावर निवेदन सादर केले परंतु त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. महाराष्ट्र राज्य सरकारने अजुन पर्यंत निधी उपब्धतेनुसार मंजूर न केल्याने सध्यातरी रमाई, शबरी व प्रधानमंत्री घरकुल योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे चित्र पंचायत स्तरावर दिसून येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे घर बांधण्यात आले आहेत ते लाभार्थी पैश्यामूळे त्रास्त आहेत. या कडे स्थानिक प्रतिनिधीनीसह प्रशासनाने लक्ष घालून त्वरित निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांना या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.



















